Sunday, May 6, 2012

देवा तुला शोधू कुठ - देऊळ

कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रुपात....
देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ....

तेहतीस कोटी रूपे तुझी तेहतीस कोटी नावे तुझी
परी तू अज्ञात.... देवा ....देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ

अरे कोठे असशी तू आकाशी कुठल्या गावी कोठे वसशी
कुण्या देवळात... देवा ....देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ

भलेबुरे जे दिसते भवती भलेबुरे जे घडते भवती
तिथे तुझा हात देवा ....देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ

स्वच्छंदी तू स्तःचा सखा येथे रमशी सांग उभा का  
या बाजारात.... देवा ....देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ


स्वर - शाहीर देवानंद माळी
गीत - सुधीर मोघे, स्वानंद किरकिरे
चित्रपट - देऊळ
संगीत - मंगेश धाकडे




No comments:

Post a Comment