तू निरागस चंद्रमा, तू सखे मधु शर्वरी
चांदणे माझ्या मनीची, पसरली क्षितीजावरी
काजळाचे बोट घे तू लावूनी गालावरी
मनमनीचे भाव सारे उमलले चेह-यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गजल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी
सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी
भोवतीचे तेज सारी वाटते दुनिया नवी
हसता तू सूर हि झंकारले वा-यावरी
मी न माझी राहिले हि नशा जादुभारी
गीत : डॉ. इंगलहर्डीकर
स्वर : स्वप्नील बांदोडकर, बेला सुलाखे
संगीत : अशोक पत्की
चित्रपट : मानिनी
No comments:
Post a Comment