Monday, March 8, 2010

नटरंग उभा



ठुमकीत ठुमकीत तदानी धूमकीट नट नागर नट धीम नट पर्वत
उभा उतुंग नवा घुमतो मृदुंग पखवाज देता वाज झनन झंकार
लेऊनि स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग

रसिक होऊ दे गंध चढू दे रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला प्राण तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वर ताल जाहले दंग || २

ये कडकड बोल ढोलकी हुंगर हि तालाची
आर छुम छुम छनन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच विनंती आमची
किरपेच दान द्यावं जी ए आवजी ||३

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वरणी कशी हि करणी करू साकार
मांडला नवा संसार आता घर दार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वर ताल जाहले दंग || २

ये कडकड बोल ढोलकी हुंगर हि तालाची
आर छुम छुम छनन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच विनंती आमची
किरपेच दान द्यावं जी ए आवजी ||३

स्वर : अजय गोगावले
गीत : गुरु ठाकूर
संगीत : अजय अतुल
चित्रपट : नटरंग

No comments:

Post a Comment