मनात माझ्या होते दोन शब्द ओळखिचे
माझ्याशी बोलत होते ते शब्द ओळखिचे
कधी ते गालावर नाचत होते
डोळ्यांच्या मिठितुन शोधत होते
ओठाच्या पाकळीत स्वप्नांच्या ओंजळीत होते
हृदयाच्या काठावरुन वाट कुणाची तरी पाहतो
नजरेच्या वाटे वरून कुठे कोणाला तरी शोधतो
आकशी हां आठवणीचा करतो रोज पसरा
श्वासांच्या या लाटे वारुनी करतो एक इशारा
कधी ते गालावर नाचत होते
डोळ्यांच्या मिठितुन शोधत होते
ओठाच्या पाकळीत स्वप्नांच्या ओंजळीत होते
एकटाच वाऱ्यासवे बेभान कुठेतरी धावतो
सुर सारे गुम्फुन हा ओढ़ मनातली सांगतो
ता-यांशी हां गगनी जाउन जोडून घेतो नाते
त्या शब्दाना सजवून भवति मन हे बहरून जाते
कधी ते गालावर नाचत होते
डोळ्यांच्या मिठितुन शोधत होते
ओठाच्या पाकळीत स्वप्नांच्या ओंजळीत होते
एल्बम : तिच्या डोळ्यातील गाव
स्वर : स्वप्निल बांदोडकर
संगीत : अवधूत गुप्ते
No comments:
Post a Comment