Tuesday, June 30, 2020

पाऊस असा रुणझुणता



पाऊस असा रुणझुता 
पैंजणे सखीची  स्मरली 
पाऊल भिजत  जाताना 
चाहूल  विरत  गेलेली.. 

ओलेत्याने  दरवळले 
अस्वस्थ फुलांचे  घोस 
ओलांडून आला गंध 
निस्तब्ध  मनाची  वेस 

[संदीप] 
पाऊस  सोहळा  झाला  
कोसळत्या  आठवणींचा...
कधी  उधाणता  अन  केव्हा 
कोसळत्या  आठवणींचा!

पाऊस असा रुणझुता 
पैंजणे सखीची  स्मरली 
पाऊल भिजत  जाताना 
चाहूल  विरत  गेलेली.. 

नभ नको नको म्हणताना 
पाऊस कशाने  आला?
गात्रांतून स्वच्छंदी अन 
अंतरात घुसमटलेला...

पाऊस असा रुणझुता 
पैंजणे सखीची  स्मरली 
पाऊल भिजत  जाताना 
चाहूल  विरत  गेलेली.. 
पाऊस असा रुणझुता....


गीत : संदीप खरे 
स्वर : सलील कुलकर्णी 
संगीत : सलील कुलकर्णी 
अल्बम :सांग  सख्या रे 


तुला जपणार आहे - खारी बिस्कीट




कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
कधी वाटेत काचा,
कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय,
हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना
तू बस खुशीत रहा ना
माझ्याही वाट्याचे
घे तुला सारे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
कधी सगळ्यात आहे
कधी आपल्यात आहे
हि माझी काळजी सारी
तुला पुरणार आहे
कधी असणार आहे
कधी नसणार आहे
तरीही आरश्यात मी
तुझ्या दिसणार आहे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे

चित्रपट - खारी बिस्कीट 
स्वर - आदर्श शिंदे आणि रोंकिनी गुप्ता 
संगीत - अमृतराज 
गीत - क्षितिज पटवर्धन 

Movie – Khari Biscuit
Music – Amitraj
Lyrics – Kshitij Patwardhan
Singers – Adarsh Shinde & Ronkini Gupta

Thursday, June 25, 2020

मनमोहिनी - मोगरा फुलला

 
 

मनमोहिनी आज पहिली
छबी तिची पाहता
या मनी राहिली
मनमोहिनी आज पहिली
हो मोगऱ्याची कळी
मी तिला वाहिली
तिचा गंध का
सोबती न कळे
तिचा बंध का
भोवती न कळे
मनमोहिनी आज पहिली
हो मोगऱ्याची कळी
मी तिला वाहिली
तिच्याच का रे
पैंजणाची
लागली ओढ ही रे मला
गुलमोहराची जोड ति अन
केशरीची तिची भावना
तिची चाल का
मन असे गुण गुणे
तिचे भास का
वाटती सोहळे
मनमोहिनी आज पहिली
हो मोगऱ्याची कळी
मी तिला वाहिली


 चित्रपट -  मोगरा फुलला

 गीत - अभिषेक  खानकर 
 
 स्वर - रोहित श्याम राऊत 

 संगीत - रोहित श्याम राऊत 


 Song Title: Manmohini 

 Movie:Mogra Phulaalaa (2019)

 Singer:Rohit Shyam Raut

 Music:Rohit Shyam Raut

 Lyrics:Abhishek Khankar