चांद मातला, चांद मातला
जीव गुंतला, जीव गुंतला..
तन मन कोरे अधीर झाले
फुंकरवारे सुखावणारे...
चांदण्यातुनी प्राण सांडला
जीव गुंतला, जीव गुंतला...
डोह सुखाचे भरून यावे
मोह कुणाचे टिपूर व्हावे
कापरापरी देह पेटला
श्वास भारला अतीव माझा
देह धुक्याचा सैल मोकळा
जीव गुंतला, जीव गुंतला..
चांद मातला, चांद मातला
जीव गुंतला, जीव गुंतला....
आत दिवे लाख पेटताना
रात भेटते दुरावताना..
आपले दुवे शोधताना
पार खोलवर रूजून ये ना...
सैर वाहता काठ गाठला
जीव गुंतला, जीव गुंतला.....
चित्रपट : लाल इश्क
स्वर : वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर
गीत :
संगीत : निलेश मोहरिर
Movie - Laal Ishq
Singers - Vaishali Samant , Swapnil Bandodkar
Lyrics -
Music - Nilesh Moharir
No comments:
Post a Comment