मन पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती
मग सावल्या सुखाच्या अन घट्ट बिलगून येती
ही रात ओठातली दरवळते चांदणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी… ये उराशी…
या सावळ्या नशेची हवा गार ओघळते
लय आज देहाची अलवार विरघळते
तू सोडवून जाशी तरी माझे गुंतणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी… ये उराशी…
या पावसाला जरा मग आर्जवे करावी
आपली तहान वेडी अर्धी-अर्धी व्हावी
मन उतू जाते आता असे त्याचे सांडणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी… ये उराशी…
चित्रपट - व्हॉट्स अप लग्न
गीत - अश्विनी शेंडे
स्वर - हृषिकेश रानडे , निहिरा जोशी देशपांडे
संगीत - निलेश मोहरीर
Song: Tu Jarashi
Movie : What's Up Lagna (2018)
Music : Nilesh Mohrir
Lyrics : Ashwini Shende
Singers : Hrishikesh Rande, Nihira Joshi Deshpande
No comments:
Post a Comment