पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले .....!!
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले ...!!
मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले ....!!
का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोष्ट स्पर्ष तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले .....!!
चित्रपट : गुपचुप गुपचुप (१९८३)
गीत : मधुसुदन कालेलकर
संगीत : अनिल - अरुण
स्वर : सुरेश वाडकर
Movie - Gupchup Gupchup
Lyrics - Madhusudan Kalelkar
Music - Anil - Arun
Singer - Suresh Wadkar
No comments:
Post a Comment