Friday, June 14, 2019
तू भेट ना - लग्न मुबारक
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती
मन माझे सांगे माझ्या कानाशी
रंग हा सारा नवा नवा
वाटे हवा हवा गंध हा
स्पर्श हा करी वेडापिसा
लागे जिवा तुझा छंद हा
तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना
हरवून गेल्या किती राती
शोधताना कुणी
बरसून गेल्या सरी साऱ्या
तरी कोरडा मी
सारे रिते सारे सुने
तुझिया विना तू भेट ना
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती
मन माझे सांगे माझ्या कानाशी
तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना
चित्रपट - लग्न मुबारक
स्वर - हर्षवर्धन वावरे
गीत - क्षितिज पटवर्धन
संगीत - ट्रॉय - आरिफ
Movie - Lagna Mubarak
Singer - Harshvardha Wavare
Lyrics - Kshitij Patvardhan
Music - Troy - Arif
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment