Tuesday, February 19, 2019

वाटा वाटा - आनंदी गोपाळ



वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं

माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं

वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं

माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं

रानफुलांहून फुलने माझे.. हट्टी गं सहा ऋतुंशी जन्माने मी.. कट्टी गं

मैत्रीण माझी मीच मला.. अप्रूप माझे मैत्रीण माझी मी मला.. अप्रूप माझे आनंदी मी आनंदाची युक्ती गं

दर्या दर्या दर्या गं
उरात शंभर लाटा गं
दर्या दर्या दर्या गं
उरात शंभर लाटा गं

लख लख मोती माझ्या आत
कसा मी वेचू आता गं

वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं.

चित्रपट - आनंदी गोपाळ
स्वर - प्रियांका बर्वे
संगीत - हृषिकेश, सौरभ आणि जसराज
गीत - वैभव जोशी


Movie - Anandi Gopal 
Singer - Priyanka Barve
Music - Hrishikesh, Saurabh & Jasraj
Lyricist - Vaibhav Joshi


No comments:

Post a Comment