रंगधनु छेडणारी मनमंजिरी मोहिनी तू परी…
स्वप्नांनी रंगणारी साजिरी गोजिरी तू परी…
होते तुझी आहे तुझी
मी उमलून येताना
अन बहरून येताना
कळला तुला कळला मला
प्रेमाचा अर्थ खरा
नात्याचा अर्थ खरा
जादूगिरी तुझी वेड लावे मला
हरवून जावे वाटते बघताना तुला
चाहूल हि नवी जीव हा गुंतला
विसरून जावे वाटते माझे मला
हरवू नको विसरू नको
आपल्या या प्रेम खुणा
हरवू नको विसरू नको
जपलेला बंध जुना
चित्रपट - बकेट लिस्ट
स्वर - श्रेया घोषाल, रोहन प्रधान
गीत - मंदार चोळकर
संगीत - रोहन - रोहन
No comments:
Post a Comment