Wednesday, February 13, 2019

बेखबर कशी तू


रोज रोज तू जवळून जाते
बावाऱ्या मनाला शहारून जाते
बघता लपून मी पहावे चुकून तू 
नजरेतून नजर चोरून ही जाते 
खुणावून हे इतके अजाण तू कशी
चंद्र हरवलेली रात्र ही जशी

बेखबर कशी तू
इशारे तरी मी करावे किती हे 
कळेल कधी तुला बेखबर अशी

स्वप्नातून माझ्या चालून येना
रोज फक्त माझी होऊन ये ना
बघण्यास आता आरसा कशाला
माझ्या डोळ्यामध्ये स्वतःला पाहून घे ना
आसपास मी अजाण तू कशी
हरणास राही कस्तुरी जशी

बेखबर कशी तू
इशारे तरी मी करावे किती हे 
कळेल कधी तुला बेखबर अशी

अल्बम - बेखबर कशी तू
स्वर - रोहित राऊत
संगीत - व्यान आणि आशिष देशमुख
गीत - व्यान

No comments:

Post a Comment