Saturday, February 15, 2014

जुळून येती रेशीमगाठी शीर्षक



मुक्याने बोलले गीत ते जाहले
स्वप्न साकारले पहाटे पाहिले
नाव ना  त्याला काय नवे
वेगळे मांडले सोहळे तुजसाठी
हो.… हो मिळावे तुझे तुला आस ही ओठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी
जुळून येती  रेशीमगाठी
आपुल्या रेशीमगाठी

मुक्याने बोलले गीत ते जाहले
स्वप्न साकारले पहाटे पाहिले

उन्हाचे चांदणे उम्ब-यात सांडले
डाव सोनेरी सुखाचे कोणी मांडले || २
खेळ  हा कलचा आज कोण जिंकले
हरवले कवडसे मिळून ते  शोधले
एकमेकांना काय हवे
जे हवे सगळेच आणले तुजसाठी
कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी
जुळून येती  रेशीमगाठी
आपुल्या रेशीमगाठी


स्वर : स्वप्निल बांदोडकर 
संगीत : निलेश मोहरीर 
मालिका : जुळून येती रेशीमगाठी

No comments:

Post a Comment