हलद लावते ग सवत्या माल्यान
इडा दिला ग गावच्या देवाला
आली आली व कुंदा बाई
आक्काची हि माऊली
कुंदा आली हलद लावा अक्काबाईचे
ए मावशे ए ताई ए कमला
आक्काच्या लग्नाला गान गाव
पैल्या धारच्या प्रेमाने साला
काळीज केलाय बाद
हि पोली साजूक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद || २
आरुन आरुन करू नको इशारा
भिडू दे आता डोल्याला डोला || २
हिथ बी ठिणगी तिथ बी ठिणगी
ए बाला जा रे
हिथ बी ठिनगी तिथ बी ठिनगी
जोसान पेटू दे आग
हि पोली साजूक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद || २
ए बाला ए बाला बाला …… बाला बाला
चोरून जरी ह्यो गेट मेट झाला
खबर झायली कोली वाऱ्याला
लागलाय ह्याचा तोल सुटाया
अग सांभाळ
इस्काची फुटलिया लाट
हि पोली साजूक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
अरे हि पोली……. तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
हि पोली साजूक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
चित्रपट: टाईमपास
गीत:
संगीत: चिनार
स्वर: रेश्मा सोनावणे, मनोहर कोलाम्ब्रे
No comments:
Post a Comment