Friday, May 18, 2012

साजणी - शेखर रवजियानी




साजणी.. नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले तू येना साजणी
साजणी... छळतो मज हा मृदगंध
तुझ्या स्पर्शासम धुंद तू येना साजणी

सळसळतो वारा  गार गार हा शहारा
लाही लाही धरतीला चिंब चिंब दे किनारा
तुझ्या चाहुलीन ओठी येती गाणी... साजणी...


साजणी.. नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले तू येना साजणी
साजणी.... छळतो मज हा मृदगंध
तुझ्या स्पर्शासम धुंद तू येना साजणी


रिमझिम रिमझिम या नादान पाई
शिवार झालं भेभान
सये भिजूया रानात मनात पानात
बरसुदे सोन्याच पाणी

हूर.. हूर.. लागी जीवा नको काढू ग सांगावा
ये ना आता बरसत ये ना साजणी... मैत्रिणी....
गुणगुणते हि माती लवलवते हि पाती
सर बरसे सयींची रुजवाया नवी नाती
तुझ्या चाहुलीन ओठी येती गाणी....  साजणी


साजणी.. नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले तू येना साजणी
साजणी... छळतो मज हा मृदगंध
तुझ्या स्पर्शासम धुंद तू येना साजणी

अल्बम -
गीत - रवी जाधव
स्वर - शेखर रवजियानी
संगीत - शेखर रवजियानी



No comments:

Post a Comment