Sunday, May 20, 2012

मला सांग ना रे मना




रानीवनी पानी का गाऊ लागे हिरवाई
वारा इशारा देई हळुवार सांगी काही
भाळी आभाळी च्या कलानी पसरावे
पर्वत वाट  सांगे चाल जाऊ नवख्या गावी
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा
ओले का चिंब हा आसमंत झाला कसा
मला सांग ना रे मना..मला सांग ना....

सावली विसावली अंतरी दिगंतरी
भाळ तू सांभाळ तू उन मी उनाड मी
अनुबंध बंधात गंध रंध्रात हा...भरावा उरावा
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा
ओलेता का चिंब हा आसमंत झाला कसा
मला सांग ना रे मना..मला सांग ना....

गायचे मागायचे धारातुनी अधरातुनी
मिठीत ये मिठास हि पेटुनी लपेटूनी
सौंदर्य दर्यात रंगत रंगातला.. नवासा हवासां
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा
ओलेता चिंब हा आसमंत झाला कसा
मला सांग ना रे मना..मला सांग ना....


चित्रपट - शर्यत
स्वर - महालक्ष्मी अय्यर, स्वप्नील बांदोडकर
गीत -
संगीत - चिनार आणि  महेश

No comments:

Post a Comment