Monday, October 24, 2011

डोळे तुझे धुंदी - तिच्या डोळ्यातलं गाव



डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी छंद हा गुलकंदी ग
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविना
हात हाती तुझा देना

नजरेला नजरेचा देशी तू नजराणा होतो मी प्रेम दिवाणा
सारे काही कळते मन माझे झुरते छळवादी तुझा हा बहाणा

वा-यावर झुलतो मी पंखावर उडतो मी.. सावर तू माझ्या मना
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविना
डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी छंद हा गुलकंदी ग
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविना

बेधुंद बेहोष बेचैन हैराण होऊनी रात्रंदिनी मी
मुखडा तुझा हसतो ठसका मनी ठसतो नाचे नशा रोमरोमी
घायाळ झालो मी हरलो ग हरलो मी नखरा तुझा सोड ना
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविना हात हाती तुझा देना

डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी छंद हा गुलकंदी ग
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविना



अल्बम - तिच्या डोळ्यातील गाव
स्वर - स्वप्नील बांदोडकर


No comments:

Post a Comment