पाटच्या या पारी जात्यावर भारी
आया बाया येती भरून आवरी
गव्हाचं बाजरीच ज्वारीचं गान जी
घर घर भरी सारी जी
अरे हणम्या
हो... ..
सोडून ऐका दुनियादारी, गावाची गोष्ट लय भारी
गावाच गावपण थोड, ऐका हो आता तुमची बारी
धान्याची बायको पळली, कान्याला जाउनी मिळाली
येश्याचा बैल आज मेला, काश्याची गाय काल ल्यायली
झंगन्याच्या भइनी भवती, गावाची समदी वस्ती
हे सासू सांग सून भांडती, सुनत फसलं सासर
असल्या या गावात, माझ्या मी टेचात नावाची गोजिरी
गातीया गान झुलतया, रान माझ्या तालावरी
साडी चोळी आणा आणा हो झंपर, वाढत्या अंगाची गावाला खबर
गावाच्या येशीवर दर्ज्याच घर जी, दारात गाव सर जी
उठ रे दाजी बैल जुम्पाजी, मोटच पण थोड सोडवनी
धाव ग जनी बोलवी धनी आन्घूळीच पाणी द्यावं कुनी
त्याचा ग कावा ना तुला ठावा पिरतीचा भार तुझा भरदार सास येतो धाउनी
म्हातारी झाली येडी म्हातारा लाडीगोडी हनाम्या बोल गणप्या हाल सुंद-या करतय नाच रं
असल्या या गावात, माझ्या मी टेचात नावाची गोजिरी
गातीया गान झुलतया, रान माझ्या तालावरी
पाण्याच गान वाज जोमानं ढोल ताश्याचा ताल झाल कुनी
लाजल पान आलंया न्हान पाखरू भिरभिर भिरत हे थांबुनी
लागलं पाठी ते कशासाठी नवतीची ज्वार पेल ना भार ठार झाली लाजुनी
गावाच्या वेशिवरला आडोसा कोनी धरला
साजणी साठी घेऊन हाती थर थर काळीज आज र
असल्या या गावात, माझ्या मी टेचात नावाची...
गातीया गान झुलतया, रान माझ्या तालावरी
रानावना मंदी चिंगारी सुटली वयात आल्याची दवंडी पिटली
फुटलं मोहाळ त्याला वारल घोड जी नदीला लागलोण जी
चित्रपट : ऑक्सिजन
संगीत : अजय अतुल
स्वर : वैशाली सामंत
No comments:
Post a Comment