Sunday, August 15, 2010

राधे कृष्ण नाम



वृन्दावानीसा  रंग हा का लावी घोर जीवाला
झाली अशी वेडीपीशी कुणी जाऊन सांगा त्याला

हा मंद गंध भवताली राधेला वाट गवसली
कधी झर झर पाण्यातून सुरसूर येती कानी
सासासा पपप पम पधपमगरेमप
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम घे गवळण राधा

डोईवरती घागर घेउनी जाई राधा नदी किनारी
हळूच कुठूनसा येई मुरारी बावरलेली होई बिचारी
शब्द शब्द अवघडले परी नजरेतूनच कळले
आज ऐकण्या ती तान होई अधीर अधीर मन
सासासा पपप पम पधपमगरेमप
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम घे गवळण राधा

गोडगोजिरी मूत सावळी प्रीतीची तव रीत आगळी
म्हणती सारे आज गोकुळी राधा माधव नाही वेगळी
मनी चांदणे फुलते पाहुनीया  अपुले नाते
कधी येणार येणार शाम रोखून डोळे प्राण
सासासा पपप पम पधपमगरेमप
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम घे गवळण राधा


अल्बम : तिच्या डोळ्यातलं गाव
स्वर : स्वप्नील बांदोडकर
संगीत : अशोक पत्की
गीत : अशोक पत्की

No comments:

Post a Comment