तुझ्या पायरीशी कोनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरना ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला...खेळ मांडला
उसवलं गनगोत सारं आधार कुणाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीन; अंगार जीवाला जाळी
बळ देई झुंजायला किरपेची ढाल दे
ईनवती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपल रान देवा पेटलं शीवार
तरी न्हाई धीर सांडला.... खेळ मांडला
सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार, पाठीशी तू -हा हुभा
ह्यो तुझ्या उंब-यात खेळ मांडला...
मांडला...
स्वर : अजय गोगावले
गीत : गुरु ठाकूर
संगीत : अजय अतुल
चित्रपट : नटरंग
No comments:
Post a Comment