हो.. ओ ...चैत पुनवेची रात आज आलीया भरात
धड धड काळजात माझ्या माईना
कधी कवा कुट कसा जीव झाला येडापिसा
त्याचा न्हाई भरवसा तोल राहीना
राखली ती मर्जी तुमच्या जोडीन मी आले
पीरतिच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ नाही बरी
पुन्हा भेटू कवा तरी साजणा...
मला जाऊ द्या ना घरी .... आता वाजेल कि बारा -३
ए. कशा पाई छळता माग माग फिरता
असं काय करता दाजी हिला भेटा कि येत्या बाजारी
ए..सहा ची बी गाडी गेली नवाची बी गेली
आता बारा ची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
मला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
हो.. ओ.. अईन्या वानी रूप माझ उभी ज्वानीच्या मी उंब-यात
नादावल खुळपीस कबुतर हे माझ्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट हि चांदण्याची
उगा घाई कशा पाई खाई नजर उभ्या गावाची
हे... नारी ग रानी ग हाई नजर उभ्या गावाची
हे.... शेत आलं राखणीला राघू झाला गोळा
शीळ घाली अडून कोनी ... करून तीरापा डोळा
आता कस किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझ मला राहीना
मला जाऊ द्या ना घरी .... आता वाजेल कि बारा -३
ए.... कशा पाई छळता माग माग फिरता
असं काय करता दाजी हिला भेटा कि येत्या बाजारी
सहा ची बी गाडी गेली नवाची बी गेली
आता बारा ची गाडी निघाली
आता बारा ची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
मला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
हो.... ओ... आला पाड झाला भार भरली उभारी घाटा घाटात
तंग चोळी अंग जाळी टच डाळिंब फुट व्हटात
गार वारा झोंबनार गाड पदर जागी ठर ना
आडोश्याच्या खोडीच मी कसं गुपित राखू कळना
हे... ए ..नारी ग रानी ग कसं गुपित राखू कळना
हे...ए ... मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या ग वर्साला मी गाठल वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताची तुम्ही -हाउद्या ...
मला जाऊ द्या ना.... आता वाजेल कि बारा -२
मला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
ए.... कशा पाई छळता माग माग फिरता
असं काय करता दाजी हिला भेटा कि येत्या बाजारी
सहा ची बी गाडी गेली नवाची बी गेली
आता बारा ची गाडी निघाली
आता बारा ची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
मला जाऊ द्या ना घरी .... आता वाजेल कि बारा
गीत : गुरु ठाकूर
स्वर : बेला शेंडे
संगीत : अजय - अतुल
चित्रपट : नटरंग
No comments:
Post a Comment